योजना आणि लाभार्थी माहिती
ग्रा.प. स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना (Schemes)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) — केंद्र सरकार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण रोजगार हमी योजना असून ती २००५ साली कायद्याद्वारे लागू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबातील प्रौढ सदस्यांना दरवर्षी किमान १०० दिवसांचे अकुशल मजुरीचे हमी रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना मागणीआधारित असून लाभार्थीने कामाची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक आहे; अन्यथा बेरोजगारी भत्ता देण्यात येतो. या योजनेअंतर्गत पाणीसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, तलाव दुरुस्ती, ग्रामीण रस्ते बांधकाम इत्यादी विकासकामे केली जातात.
📌 उद्देश:
ग्रामीण भागातील कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार देऊन उपजीविका सुरक्षित करणे।
📌 अर्ज प्रक्रिया:
तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात (ग्रामविकास अधिकारी / ग्राम रोजगार सेवक) अर्ज सादर करावा लागतो.अर्ज पद्धत Job Card साठी अर्ज: ग्रामपंचायतमध्ये “Job Card Registration Form” भरणे आवश्यकता पडल्यास ग्राम सेवक मदत करतो काम मागणी (Work Demand) Job Card तयार झा
📌 पात्रता:
अर्जदार ग्रामीण भागाचा रहिवासी असावा. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याअधिक असावे. अंगमेहनतीच्या कामासाठी तयार असणे आवश्यक. या योजना अंतर्गत प्राथमिकता देण्यात येते: अनुसूचित जाती/जनजाति, भटक्या जमाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे इत्यादी.
📌 आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड पत्त्याचा पुरावा (Aadhaar/RATION कार्ड/इतर) बँक पासबुक/बँक खाते तपशील जॉब कार्ड अर्जासाठी आवश्यक फॉर्म व फोटो कौटुंबिक नोंदणी अर्ज व फोटो �
📌 लाभ व अनुदान:
ग्रामीणांना नियमित रोजगार व उत्पन्न मिळते. मजुरी थेट बँक खात्यात जमा. सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास. सामाजिक व आर्थिक सुरक्षा वाढते.
ऑनलाइन संकेतस्थळ : https://mgnrega.in
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही केंद्र सरकारची एक महत्वाची रोजगाराभिमुख योजना असून ती 2005 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी किमान 100 दिवसांचे अकुशल मजुरीचे हमी काम उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा आणि त्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी ही योजना राबविण्यात येते.📞 संपर्क माहिती
- संपर्क व्यक्ती: ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामपंचायत कार्यालय
- कार्यालय: ग्रामपंचायत
- संपर्क क्रमांक: -
फोटो / व्हिडिओ गॅलरी